नाशिक नोटप्रेस परिसरात अग्नितांडव; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

नाशिक येथे जेलरोड मध्ये असलेल्या करन्सी नोट प्रेसच्या पाठीमागे असलेल्या परिसरात भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. यापूर्वीदेखील उन्हाळ्यात आग लागल्याच्या घटना घडलेल्या असल्याने हे अति उष्णनेतेने पेट घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.

आग लागली तिथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याने गवत व कचऱ्याचे साम्राज्य होते. उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

आगीत परिसरातील गवत मोठ्या प्रमाणात जळाले आहे. मात्र, ही आग लागली की लावली गेली याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू असून अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.