पंतप्रधांनी केले महाराष्ट्रभूमीचे तोंडभरून कौतुक

महाराष्ट्राचे संस्कार विश्वाभरासाठी प्रेरणा देणारे

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव येथे लखपती दीदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असून त्यांनी कार्यक्रमाच्या महिलांच्या उपस्थितीचे यावेळी विशेष कौतुक केले.  यावेळी संबोधन करतांना त्यांनी महाराष्ट्र भूमीच्या पावित्र्याची महतीच सांगितली.

 

पंतप्रधान म्हणाले, आज इथून देशभरातील लाखो सखी मंडळांसाठी सहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी जारी करण्यात आला आहे. लाखो बचत गटांची सोडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील आमच्या बहिणींना सुद्धा कोट्यावधी रुपयाची मदत मिळाली आहे. या पैशातून लाखो बहिणींना लखपती दीदी बनायला मदत मिळणार आहे. मी या  सर्व माता बहिणींना खूप खूप शुभेच्छा देतो.

 

पंतप्रधान पुढे म्हणाले, तुम्हा सर्वांमध्ये मला महाराष्ट्रातील गौरवशाली संस्कृती आणि संस्कारांची देखील दर्शन होत आहे. आणि महाराष्ट्रातील हे संस्कार भारतातच नव्हे तर विश्वभरात पसरलेले आहेत. मी कालच परदेशी दौऱ्यातून परतलो. मी युरोपातील पोलंड मध्ये  गेलो होतो आणि तिथे सुद्धा मला महाराष्ट्राचे दर्शन झाले. पोलंडचे लोक महाराष्ट्रातील लोकांचा खूप सन्मान करतात. इथे बसून तुम्हाला याची कल्पना येणार नाही. तेथील राजधानी मध्ये एक कोल्हापूर मेमोरियल आहे. हे मेमोरियल कोल्हापूरच्या लोकांच्या सेवा आणि सत्काराला सन्मानित करण्यासाठी सुरू केले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी पोलंडच्या हजारो माता बहिणींना कोल्हापूरच्या राजघरणांनी शरण दिले होते.

 

जेव्हा समाजात मुलींची शिक्षा मुलींच्या कामकाजाला महत्व दिल जात नव्हतं, तेव्हा सावित्रीबाई फुले पुढे आल्या. म्हणजेच भारताच्या मातृशक्तीने नेहमी समाजाने राष्ट्राच्या भविष्याला निर्माण करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. आजचे विकसित बनण्यासाठी प्रयत्न करत आहे तेव्हा पुन्हा आपली मातृशक्ती पुढे येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कारांच्या अनुरूप राजघराण्यांनी, सामान्य लोकांनी त्यांची सेवा केली आहे. जेव्हा मी तिथे महाराष्ट्रातील लोकांच्या सेवाभाव, मानवता प्रेमाचे भूषण ऐकत होतो, तेव्हा माझा माथा गर्वाने उंच झाला. आम्हाला अशाच महाराष्ट्राचा विकास करून महाराष्ट्राचे नाव संपूर्ण विश्वात अधिक उंच करत राहायचे आहे.  असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

 

आमचे जळगाव हे तर वारकरी परंपरेचे तीर्थ

महाराष्ट्राच्या संस्कारांना येथील वीर आणि वीरमातांनी निर्माण केलाय. येथील मातीतल्या मातृ शक्तीने संपूर्ण देशाला प्रेरित केले आहे. आमचे जळगाव हे तर वारकरी परंपरेचे तीर्थ आहे. महान संत मुक्ताईची ही भूमी आहे. त्यांची साधना, त्यांचे तप हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादाणी आहे. बहिणाबाईंच्या कविता आजही समाजाला रुढींमधून बाहेरचा विचार करण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत.  महाराष्ट्राचा कोणताही कोपरा असो इतिहासा कोणताही कालखंड असो मातृ शक्तीचे योगदान अप्रतिम राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाला कोणी दिशा दिली? हे काम माता जीजाऊने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.