Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    • गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»त्याला त्याच जागेवर ठेचून मारा, तो माझा बाप हीच माझी चूक!
    महाराष्ट्र

    त्याला त्याच जागेवर ठेचून मारा, तो माझा बाप हीच माझी चूक!

    नरसापूर घटनेतील आरोपीच्या बायको अन् मुलाची प्रतिक्रिया
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 4, 2026No Comments672 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याची घटना घडल्यानंतर या घटनेतील आरोपीचे कुटुंबीय पहिल्यांदाच एका माध्यमाशी बोलेले. यावेळी ज्या ठिकाणी चिमुरडीवर अत्याचार झाला आहे. त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारलं पाहिजे अशी प्रतिक्रिया देत आरोपीची पत्नी ढसाढसा रडली. तर तो माझा बाप आहे हीच माझी चुकी आहे. त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्याच्या मुलानी केली.

    आरोपीची पत्नी म्हणाली की, ज्या ठिकाणी घटना घडली, त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारलं पाहिजे. मला अकरा नातवंड आहेत. घटना घडल्यापासून मी अन्नपाणी घेत नाही. त्या बाळाचा आत्मा काय म्हणाला असेल? त्या बाळाच्या घरच्यांना, तिच्या आईला काय वाटत असेल? मी पण कुणाची तरी आईच आहे. आमचा आरोपीशी 10 वर्षापासून संपर्क नाही. तो घरी राहत नाही. आम्ही दोघेच मायलेकरं राहतो. 10 वर्षात त्याला आम्ही घरी बोलावण्याचा प्रयत्न केला. पण तो म्हणाला तुझं तू बघ, असं आरोपीची पत्नी म्हणाली.

    त्याने 65 वर्षाच्या महिलेवर अत्याचार केले तेव्हा हा मुलगा माझ्या पोटात होता. याआधी त्याच्यावर झालेले अत्याचाराचे आरोप- घटना मला माहिती आहेत. मान्य आहेत. तो मोलमजुरी करून खात होता. तो गावातील इतर महिलांच्या घरात लपून बसून, घरात कुणी नसल्याचं पाहून चाकूचा धाक दाखवून महिलांवर लैंगिक अत्याचार करायचा. या गावकऱ्यांच्या आरोपाबद्दल मला माहिती नाही. तो तसं करत असेल तर मला माहिती नाही. कुठल्या महिलेने सुद्धा माझ्यापर्यंत हे पोहोचवलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

    गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे जर त्यानी माझ्या मुलीवर अत्याचार केला असता, तर त्याची तक्रार मी स्वतः केली असती. माझ्या पोरींवर असं झालं असतं तर मी गप बसली असते का? मला सात पोरी आहेत. मी स्वतः गप बसले नसते. मला या गोष्टीचा खूप राग आहे. माझ्या पोरी मोलमजुरी करून पोट भरत होत्या. माझ्या पोरींवर तो अत्याचार करायचा हे गावकऱ्यांचे आरोप चुकीचे आहेत. ते आमची बदनामी करत आहेत. अशी घटना झाली असती तर हे कुठल्या आईला सहन होईल? असा सवाल त्यांनी केला.

    त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारलं पाहिजे

    बाहेर तो काय करायचा याबद्दल मला माहिती नाही. पण त्याने घरात माझ्या मुलींसोबत काहीही केलेलं नव्हतं. मुलींवर अत्याचार करायचा हे आरोप खोटे आहेत. जमीन जुमला विकायचा होता म्हणून त्याच्या थोरल्या भावानं पैसे देऊन त्याला जेलमधून बाहेर काढला. ज्या जागी ह्या चिमुरडीवर अत्याचार झालेला आहे, त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारलं पाहिजे, असं म्हणतं त्या ढसा ढसा रडल्या. मला वेदना होत आहे. अंगाचा लटपट उडतोय नाव ऐकलं तरी, असंही त्या म्हणाल्या.

    तो माझा बाप आहे हीच माझी चुक

    आरोपीच्या मुलानेही प्रतिक्रिया व्यक्त केली. तो माझा बाप आहे हीच माझी चुकी आहे. त्याने चिमूरड्यावर केलेल्या अत्याचाराचा मी जाहीर निषेध करतो. त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा करा, असे मी सरकारला आवाहन करतो. मी त्याचा मुलगा आहे हे माझं मोठं दुर्दैव आहे. त्या चिमुरडीला जेवढ्या वेदना झाल्या तेवढ्या वेदना ह्याला झाल्या पाहिजेत. याला लोकांच्या हवाली केले पाहिजे आणि ठेचून मारला पाहिजे, असं आरोपीच्या मुलाने म्हटलंय.

    त्याने स्वतःच्या पुतणीवर अत्याचार केला तेव्हा मी नववीत होतो. तेव्हा मला समज होती. तेव्हा आम्हाला घरदार सोडून जावं लागलं होतं. त्यानंतर मला बाप म्हणजे काय माहितीच नाही. त्याच्यासोबत संबंध संपवला होता. आज माझ्या सात बहिणी आहेत, आई आहे. आम्ही न्याय कुणाला मागायचा? जे कृत्य माझ्या वडिलांनी केलंय त्याचा दोष कुटुंबाला देणं चुकीचं. सरकारला विनंती आहे की, चिमुरडीला लवकरात लवकर न्याय मिळावा. चिमुरडीला इतक्या क्रूरतेने मारलं. हा माझा बाप नव्हताच, असं मला म्हणावं वाटतंय, असंही तो म्हणाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif