Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»लोकशाही विशेष»धरणगावात पिके करपली; खरीप हंगाम वाया जाण्याची भीती
    लोकशाही विशेष

    धरणगावात पिके करपली; खरीप हंगाम वाया जाण्याची भीती

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 13, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    विनोद रोकडे

    धरणगाव

    तालुक्यातील साळवे, जाभोरा, बाबोरी, नांदेड, हेडगेवार नगर, या भागात एक थेंबही पावसाचा न झाल्याने खरीप हंगामावर मोठे संकट कोसळले आहे. सोनवद धानोरा गारखेडा परिसरातील शेतांमध्ये मका, मूग, सोयाबीन, कापूस, उडीद, बाजरी, ज्वारी यासारखी पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. सुमारे ७५ टक्के पिके वाया गेली असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. शेत-शिवारात उभ्या पिकांची वाढ थांबली असून, पाने पिवळी पडत आहेत. पिके उष्णतेने कोमजू लागली आहेत. जलस्रोतही आटू लागल्याने बोअरवेल व विहिरींचा आधारदेखील पुरेसा ठरत नाही. काही ठिकाणी फवारणीसाठी पाणी नाही.

    शेतकऱ्यांनी यंदा चांगल्या पिकासाठी महागडी खते, बी-बियाणे, औषधे यावर मोठा खर्च केला होता. मात्र, आता तोच खर्च वाया जात असल्याचे दुःख शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. वाढती महागाई, मजूर याला तोड द्यावे लागत जर आता पाऊस झाला नाही, तर हे सर्व घामाचे पैसे वाया जाणार, अशी भीती शेतकरी वर्गात व्यक्त होत आहे.

    परिस्थितीमुळे दुष्काळ जाहीर करावा

    प्रगतिशील शेतकरी छोटू जाधव, या शेतकऱ्यांनी सांगितले की, आजपर्यंत असा एकही पाऊस झाला नाही की, शेतातून पाणी वाहून जाईल. विहिरीही कोरड्या पडल्या आहेत. शासनाने तातडीने कृत्रिम पावसासाठी पावले उचलावीत. धरणगाव तालुक्यातील शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत चातकासारखे डोळे लावून आहेत. काही दिवसांत जरही पावसाची सर झाली नाही, तर संपूर्ण खरीप हंगाम वाया जाऊ शकतो. शेतकऱ्यांनी पेरणी व मशागतीसाठी शासकीय कर्ज, खाजगी सावकार, बँकांचे कर्ज अशा विविध मार्गाने पैसे उभे केले आहेत. आता पीकच उद्ध्वस्त झाल्यास ते कर्ज फेडण्याचा कोणताही मार्ग शिल्लक नाही. कर्ज फेडायचे कसे अशी चिंता शेतकऱ्यांना लागून आहे, माय बाप शासन दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif