‘यांना खतम करा’ असे बाजारबुणगे म्हणाले..

संपविण्याची भाषा करणाऱ्यांना योग्य धडा शिकवू : अमित शाह यांचे नाव न घेता कुणी केली टीका?

0

 

मुंबई

महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजारबुणगे नागपूर येथे येऊन आम्हाला संपविण्याची भाषा करुन गेले आहेत, मी त्यांचे भाषण काही ऐकलेले नाही. परंतू येथे येऊन उद्धव ठाकरेंना खतम करा, शरद पवार यांना खतम करा असे बाजारबुणगे म्हणाले आहेत. परंतू हा महाराष्ट्र शुरवीरांचा आहे. तुम्ही या तर खरे कोण कोणाला संपवितो ते पाहतो. आम्हाला संपविण्याची भाषा करतात त्यांना योग्य धडा शिकवू असे अमित शाह यांचे नाव न घेता शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.

 

विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हे कुटुंब पुन्हा शिवसेनेत परतले आहे त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. वाणी साहेबांनी शिवसेना येथे बांधली आहे. वाणी साहेब आज आपल्यात नाहीत अशीही आठवण ठाकरे यांनी यावेळी सांगितली. गेल्या आठवड्यात आपल्याकडे आलो होतो. आता उलटा प्रवास सुरु झाला आहे. भाजपाच्या कट्टर कार्यकर्त्यांना सांगतो. हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही जे थोतांड माजवले. तसले आमचे हिंदुत्व नाही असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

 

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की वाणी साहेब आज आपल्यात नाहीएत. गेल्यावेळी आपणच उभे रहा असे आवाहन केले होते. वैजापूरातील निष्टेचा पुन्हा विजय झाला आहे. वाणी साहेबांची निष्टा घेऊन शिवसेनेचा भगवा पुन्हा भडकावा असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. आपण आता जास्त काही बोलत नाही. परंतू आता पुन्हा येथे प्रचाराला येईल तेव्हा आपल्या तोफा खऱ्या अर्थाने धडाडतील असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.