Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»जेव्हा सत्ता डोक्यात जाते तेव्हा लोक..
    राजकारण

    जेव्हा सत्ता डोक्यात जाते तेव्हा लोक..

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 23, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    चिपळूण

    रत्नागिरीतील चिपळूणमध्ये 18 वर्षांनंतर शरद पवारांची जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. विशेष म्हणजे भाजप नेते नितेश राणे यांच्यावर खरपूस टीका केली. धारावीतील मस्जिदचा अनधिकृत भाग पाडण्यात आला, त्याबाबत भाजप नेते नितेश राणे यांनी प्रक्षोभक विधान केलं. त्याचा शरद पवारांनी जोरदार समाचार घेतला. सोबतच भाजप नेते नारायण राणे यांच्या मुलांवरही शरद पवारांनी जोरदार टीका केली आहे. सत्ता येते आणि जाते. तेव्हा संयम ठेवायचा असतो. सत्ता असते तेव्हा जमिनीवर पाय ठेवायचा असतो. आणि सत्ता नसेल तर चिंता करायची नसते. काम करत राहायचं असतं, अशा शब्दात शरद पवारांनी सुनावलं आहे.

     

    शरद पवार म्हणाले, रत्नागिरी या जिल्ह्यात काय घडलं माहीत नाही. हा जुना जिल्हा आहे. या जुन्या जिल्ह्यात एक मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होते. आणि अलिकडे मी बघतो. मीही मुख्यमंत्री होतो. माझ्या घरात एक मुलगी आहे. देशाच्या पार्लमेंटमध्ये चांगलं काम करणारी तिचा लौकीक आहे. विनम्रपणा हा लौकीक आहे. पण सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक मुख्यमंत्री दिला. त्यांनी माझ्यासोबत काम केलंय. त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण त्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीने हल्ली बोलतात, ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करतात, मी महाराष्ट्रातील इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पुढची पिढी या प्रकारची झालेली पाहिली नाही. आज त्या लोकांची भाषा, ही कशा प्रकराची भाषा आहे. समाजात सर्व जाती धर्माचे लोक आहेत, असं शरद पवार यांनी सभेत म्हटलं.

     

    भारत हे राष्ट्र सर्व धर्मीयांचं आहे. इथे हिंदू, सीख आणि मुस्लिम आहेत. आणि तुमच्या राज्यातील एका केंद्रीय मंत्र्यांची मुलं मुस्लिम समाजाच्या संबंधी या पद्धतीने जाहीर वाक्य करतात त्यांना आवर घातलं जात नाही. उलट टेलिव्हिजनवर त्यांनी बोलावं याची काळजी घेतली जाते याचा अर्थ सत्ता डोक्यात गेली आहे. जेव्हा सत्ता डोक्यात जाते तेव्हा लोक एक होतात आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहत नाही, असं पवारांनी यावेळी म्हटलं आहे.

    Chipalun jalgaon Narayan rane Ratnagiri sharad pawar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif