Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अवैध दारू, सट्टा-जुगार व पेट्रोल विक्रीप्रकरणी गुन्हे
    गुन्हे वार्ता

    अवैध दारू, सट्टा-जुगार व पेट्रोल विक्रीप्रकरणी गुन्हे

    अनेक आरोपींवर कारवाई : पिंपळगाव हरेश्वर पोलिसांना यश
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 29, 2026No Comments139 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवून पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी मोठी कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके तयार करून गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी करण्यात आली.

    या कारवाईत सातगाव डोंगरी येथील गावठी हातभट्टीची दारू तयार करतांना बाजीराव तुराब तडवी, दीपक सुपड्डु तडवी, पिंप्री खुर्द येथील शौकत सिकंदर तडवी, शिंदाड येथील कासम रमजान तडवी, अनिल मासुम तडवी, सुनिल मासुम तडवी, पिंप्री येथील सोपान चंदु तडवी, कुऱ्हाड खुर्द येथील संतोष राजु भिल व कुऱ्हाड बुद्रुक येथील भिवराबाई भिल यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी या कारवाईत 4,900 लिटर कच्चे रसायन, 350 लिटर उकळते रसायन आणि 210 लिटर तयार गावठी दारू असा एकूण 2 लाख 83 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    तसेच पिंपळगाव हरेश्वर येथील बाजारपट्टा परिसरात सट्टा, जुगार खेळवितांना पिंपळगाव हरेश्वर शनी चौकातील भागवत लक्ष्मण पाटील, शंकरपुरा येथील दिलीप कांतीलाल तेली, गजानन भिवसन बहादुरे, गोविंद पुरा येथील शिवानंद तुळशीराम लोहार, ज्ञानेश्वर प्रकाश तेली, मातोश्री नगर येथील शंकर प्रकाश तेली, पाचोरा येथील विकास पांडुरंग पाटील व संदिप पाटील यांना पोलिसांनी पकडले. त्यांच्या ताब्यातून 54 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दरम्यान सोयगाव तालुक्यातील वनगाव पोहरी येथील मुळ रहिवासी हल्ली मुक्काम वाडी शेवाळे मंगेश दिलीप काचोळे हा वाडी शेवाळे बसस्टँड परिसरातील टपरीत कोणताही परवाना नसतांना पेट्रोलची अवैध विक्री करतांना आढळून आला. त्याच्याकडून अंदाजे 35 लिटर पेट्रोल जप्त करण्यात आले असून आवश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 03 व 07 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पानटपऱ्यांवर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करतांना अनिल संजय गुंजाळ, शरीफखाँ जिकरेखाँ पठाण, मनोज सुकलाल जाधव व पंकज भाऊराव गरुड यांच्याविरुद्ध तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंधक अधिनियम 2003 चे कलम 6 (ब) व 24 अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif