जीमवरून आल्यानंतर तरुणाचा हाफ फ्राय अंडे खाल्ल्याने मृत्यू ?

0

जीमवरून आल्यानंतर तरुणाचा हाफ फ्राय अंडे खाल्ल्याने मृत्यू ?

इंदौर (प्रतिनिधी) : फिटनेसची आवड असलेल्या आणि रोज व्यायाम करणाऱ्या एका तरुणावर जीमनंतर घरी परतल्यावर भीषण प्रसंग ओढावला. जीमवरून आल्यावर त्याने हाफ फ्राय अंडे खाल्ले, पण अवघ्या अर्ध्या तासातच त्याचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून, आरोग्यतज्ज्ञ आणि नागरिकांमध्ये यावर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदौरमधील बाणगंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खातीपुरा परिसरात राहणारा संदीप (वय ३२) हा गेली सहा वर्षे नियमित जीम करणारा तरुण होता. मंगळवारी सायंकाळी तो नेहमीप्रमाणे जीमला गेला होता. एका तासाच्या व्यायामानंतर तो आपल्या दुकानात गेला आणि तिथेच स्वतः बनवलेले हाफ फ्राय अंडे खाल्ले. काही वेळाने तो घरी परतला, मात्र घरी पोहोचताच त्याला छातीत जळजळ, घबराट आणि श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.

त्याची प्रकृती झपाट्याने बिघडल्याने भावाने तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. संदीपच्या अचानक मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, स्थानिक रहिवाशांनी त्याचं आरोग्य उत्तम असल्याचं सांगितलं.

दरम्यान, या घटनेनंतर “जीमनंतर लगेच तळलेले पदार्थ खाणं कितपत योग्य?” असा प्रश्न उपस्थित झाला आहे. व्यायामानंतर शरीरातील रक्तप्रवाह आणि हृदयाची धडधड वाढलेली असल्याने, तत्काळ तेलकट किंवा प्रथिनयुक्त अर्धवट शिजवलेले पदार्थ सेवन केल्यास शरीरावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असा तज्ञांचा इशारा आहे.पोलीसांनी घटनेची नोंद घेतली असून, मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी शवविच्छेदनाचा अहवाल येण्याची प्रतीक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.