कौटुंबिक वादातून मारहाण, १५ दिवसांनी तरुणाचा मृत्यू ; सासरे व शालकाविरुद्ध गुन्हा
जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील नांद्रा येथे राहणाऱ्या योगेश प्रल्हाद पाटील (४४) यांचा कौटुंबिक वादातून झालेल्या बेदम मारहाणीत उपचारादरम्यान २७ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचे सासरे निवृत्ती तुकाराम पाटील आणि शालक चेतन पाटील (दोघे रा. सवतखेडा) यांच्यावर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१२ सप्टेंबर रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या गेटवर योगेश पाटील यांना आरोपींनी मारहाण केली होती. त्यानंतर ते गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत होते. पंधरा दिवसांनी त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबात शोककळा पसरली असून घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख तपास करीत आहेत.


