Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»जळगाव बसस्थानकावर महिलेची ६० हजारांची सोनसाखळी चोरी
    ताज्या बातम्या

    जळगाव बसस्थानकावर महिलेची ६० हजारांची सोनसाखळी चोरी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 30, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव बसस्थानकावर महिलेची ६० हजारांची सोनसाखळी चोरी

    जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क

    : शहरातील नवीन बसस्थानक परिसरात एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी २८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

    जामनेर येथील कल्पना सुनील लखोटे (वय ५९, रा. माळी गल्ली, जामनेर) या काही कामानिमित्त जळगाव शहरात आल्या होत्या. काम आटोपून त्या जामनेरला परतण्यासाठी नवीन बसस्थानकावर गेल्या असताना, गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी तोडून पळ काढला. या साखळीची किंमत अंदाजे ६० हजार रुपये आहे.

    या घटनेमुळे बसस्थानक परिसरातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा पेठ पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif