वाहन लावण्यावरुन वाद, हवलदरावर केला तलवारीने वार

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

सोलापूर/पंढरपूर : वाहन लावण्यावरुन वाद, हवलदरावर केला तलवारीने वार.तालुका पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदारावर लक्ष्मी टाकळी (ता. पंढरपूर) येथे चार जणांनी तलवारीने वार केला. परंतू त्यांनी तो चुकवल्याची घटना मंगळवारी रात्री सातच्या सुमारास घडली.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, लक्ष्मी टाकळीत जगदंबा नगर येथे एका रस्त्यावर पोलीस हवालदार स्वप्नील वाडदेकर हे वाहनावरुन निघाले होते. यावेळी रस्त्यात एक वाहन उभे होते. हे वाहन बाजूला घेऊन रस्ता मोकळा करून द्या, असे वाडदेकर यांनी संबंधितास सांगितले.

इतक्यात एकाने तू मला सांगणार कोण म्हणत त्याने वाडेदकर यांना मारहाण सुरू केली. त्यानंतर तलवारीने वार केला. परंतू त्यांनी तो चुकवला. वाडदेकर यांना उपचारसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा प्रकार शशिकांत भोसले, शुभम शशिकांत भोसले, सूचित शशिकांत भोसले व आणखी एक साथीदार (सर्व रा. लक्ष्मी टाकळी, ता. पंढरपूर) यांनी केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी घटना स्थळी भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here