Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»तेलीचौकात दोन जणांवर धारदार चॉपरने जीवघेणा हल्ला
    जळगाव

    तेलीचौकात दोन जणांवर धारदार चॉपरने जीवघेणा हल्ला

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 20, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जळगाव ; शहरातील तेली चौकात दोन जणांना शिवीगाळ करून धारदार चॉपरने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नारायण प्रकाश कोळी (वय-३५) रा. पांजरापोळ पाण्याची टाकीजवळ  हा शुक्रवारी १८ फेब्रुवारी रोजी मित्रांसोबत रंगपंचमी खेळत होता. यावेळी पप्पू मराठे व एका दुचाकीस्वारामध्ये वाद झाला.

    यावेळी नारायण कोळी याने हा वाद मिटवित तो घराकडे जात असतांना तेली चौकात पराग राजेंद्र पाटील (वय-१९) हा तरुण शिवीगाळ करीत होता. नारायण याने पराग याला शिवीगाळ का करतो असे बोलल्याने त्याचा राग आला. त्याने रागाच्या भरात आपल्या हातातील चॉपरने नारायण कोळी याच्यावर वार केले.

    यात नारायण याच्या हातावर, पाठीवर, डोक्यावर सुमारे पंधरा घाव लागले आहेत. तसेच हा वाद मिटवित असतांना नारायण याचा मित्र दीपक चौधरी उर्फ मच्छी याच्यावर देखील पराग याने वार करीत त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी नारायण याच्या फिर्यादीवरून पराग राजेंद्र पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जखमी नारायण कोळी याला त्याच्या मित्रांनी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करीत असतांना याठिकाणी उपचारासाठी दाखल करणार्‍या एका गटाने त्यांच्यावर हल्ला चढविला. यात जखमी नारायण कोळी याच्यासह त्याच्या मित्राला या जमावाने मारहाण केल्यामुळे जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

    crime news jalgaon Jalgaon Crime News
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif