Wednesday, May 25, 2022

संतापजनक! अल्पवयीन मुलीवर 80 नराधमांचा 8 महिने बलात्कार

लोकशाही न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली – तेलंगणामध्ये 13 वर्षांच्या मुलीवर आठ महिने बलात्कार करण्यात आल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर 80 जणांकडून तब्बल 8 महिने बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तेलंगणामध्ये 13 वर्षांच्या मुलीवर आठ महिने बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घडली. पीडित मुलीला जबदस्तीने देहविक्री व्यवसायात ढकलण्यात आलं होतं. पोलिसांना गुंटूर येथून या मुलीची सुटका केली आहे.

पोलिसांनी अधिक तपास केला असता आठ महिन्यांत तब्बल 80 जणांनी या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचं समोर आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सर्व 80 नराधमांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी 10 जणांना अटक केली असून यामध्ये एका बी.टेक विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

अजून काही आरोपी यामध्ये सामील असण्याची शक्यता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पीडित मुलीला सवर्ण कुमारी या महिलेने दत्तक घेतले होते, जिने जून 2021 मध्ये कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान रुग्णालयात तिच्या आईशी मैत्री केली होती.

मुलीच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता आणि त्यानंतर ही महिला मुलीच्या वडिलांच्या नकळत मुलीला सोबत घेऊन आली होती. ऑगस्ट 2021 मध्ये मुलीच्या वडिलांनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी मुख्य आरोपी महिला सवर्ण कुमारीची ओळख पटवली. या प्रकरणी पहिली अटक जानेवारीमध्ये करण्यात आली होती आणि मंगळवारी, 19 एप्रिल रोजी गुंटूर पश्चिम विभाग पोलिसांनी बीटेकच्या विद्यार्थ्यासह आणखी 10 जणांना अटक केली. आरोपी आणि पीडितेची चौकशी केल्यावर पोलिसांना पीडितेच्या स्थितीतील वेदनादायक आणि धक्कादायक वास्तव समोर आले.

गेल्या आठ महिन्यांपासून एका 13 वर्षीय मुलीला आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील वेगवेगळ्या ठिकाणी वेश्याव्यवसायासाठी पाठवले जात होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक के सुप्रजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 80 आरोपींपैकी 35 दलाल आहेत आणि बाकीचे ग्राहक आहेत. एएसपीने खुलासा केला की, “मुलीच्या वयाचा आणि स्थितीचा फायदा घेऊन, अनेक टोळ्यांनी मुलीला विकत घेतले आणि विविध ठिकाणी नेले आणि तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले.” एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या