Tuesday, May 24, 2022

लहान मुलांच्या भांडणावरून धारदार शस्त्राने तीन जणांवर प्राणघातक हल्ला

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

मलकापूर :- तालुक्यात वाघुड गावात  लहान मुलांच्या भांडणावरून मोठ्या मध्येही वाद होत हाणामारी होऊन

धारदार शस्त्राने तीन जणांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना रात्री 10 वा दरम्यान घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की वाघुड येथे दि.16 एप्रिल रोजी लहान मुलांच्या नाचण्यावरुन राऊत व वानेरे परीवारामध्ये वाद निर्माण होऊन शाब्दिक चकमक झाली गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थांनी समजुत काढून वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले मात्र दुसऱ्या दिवशी रात्री दहा वाजेदरम्यान वानेरे परीवाराने धारदार शस्त्राने राऊत कुटुंबियांवर हल्ला केला.

या हल्ल्यात गौरव मुरलीधर राऊत वय 24,मुरलीधर दत्तात्रय राऊत वय 40,आई गंगा बाई मुरलीधर राऊत वय 60 , हे तिघे गंभीर जख्मी झाल्याने त्यांना ग्रामस्थांनी प्राथमिक उपचारासाठी मलकापुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले अतिरक्तस्राव झाल्याने तिघांनाही रात्रीच पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

याबाबतची फिर्याद गंगुबाई मुरलीधर राऊत यांनी शहर पो.स्टे ला दिली असुन फिर्यादीत नमुद केले आहे की जुन्या भांडणाचे कारणावरुन काल रात्री दहा वाजेदरम्यान महेश सोपान वानेरे,गणेश ज्ञानदेव दांडगे, ज्ञानु वानेरे, योगेश ज्ञानदेव वानेर यांनी धारदार तलवारीने मारहाण केल्याने तिघांना गंभीर जख्मी केले अश्या फिर्यादीवरून पोलिसांनी कलम 324,504,506,34,4(25) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो.उप.नि संजय ठाकरे, ऐएसआय सुरेश रोकडे करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या