Tuesday, May 24, 2022

सदावर्तेंच्या पत्नीविरोधात FIR दाखल

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

वकील सदावर्ते यांच्या अटकेनंतर दुसऱ्या दिवशीच जयश्री पाटील यांनी पोलीस संरक्षण सोडलं आहे.राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या अटकेनंतर त्यांच्या पत्नी वकील जयश्री पाटील यांनी पोलीस संरक्षण सोडलेलं आहे. कारण, त्यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून जयश्री पाटील यांचा शोध सुरू आहे.

- Advertisement -

गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना आज सातारा न्यायालयात हजर करण्यात आले. या पार्श्वभुमीवर शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये सातारा शहर पोलीस ठाण्यात मराठा आरक्षण प्रकरणी एका वृत्तवाहिनीवरती आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबच्या गुन्ह्यात गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी काल (गुरुवार) मुंबईतून ताब्यात घेतलं आहे.

आज सातारा पोलीस त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे. दरम्यान सातारा पोलीस ठाण्यात गुरुवारी सदावर्ते यांना आणल्यानंतर काही मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या