Thursday, May 26, 2022

मांजराला काठीने बेदम मारहाण मृत्युप्रकरण महिलेवर गुन्हा दाखल

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

पुणे ; मांजराला काठीने बेदम मारहाण मृत्युप्रकरण महिलेवर गुन्हा दाखल. मांजराला काठीने बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना गोखलेनगर भागात घडली. या प्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत प्रशांत दत्तात्रय गाठे (वय ५३, रा. शिर्के पिठाच्या गिरणी शेजारी, गोखलेनगर) यांनी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी शिल्पा नीलकंठ शिर्के (रा. शिर्के पिठाच्या गिरणीशेजारी, गोखलेनगर) या महिलेच्या विरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागणूक दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिर्के यांच्या घरात मांजर शिरल्याने शिल्पाला राग आला. तिने काठीने मांजराला मारहाण केली. मारहाणीत मांजराचा मृत्यू झाला. त्यानंतर शिर्के यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार मोरे तपास करत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या