औरंगाबाद पाठोपाठ पुण्यातही ऑनलाईन डिलीव्हर झाल्या तब्बल ९२ तलवारी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

पुणे; औरंगाबाद पाठोपाठ पुण्यातही  ऑनलाईन डिलीव्हर झाल्या तब्बल ९२ तलवारी .आजकाल कुरिअर सेवा हे कमी वेळेत वस्तू पोहोचवण्याचं सोपं साधन झाली आहे. अनेकजण ही सेवा वापरतात. मात्र, ऑनलाईन तलवारी मागवण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढलं आहे. (Pune Crime News)

पिंपरीत कुरियरच्या पार्सलमध्ये तब्बल ९२ तलवारी आणि दोन कुकरी आल्याचा धक्कादायक प्रकार दिघी येथे उघडकीस आला.हा शस्त्रसाठा पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केला आहे. (Swords in Pune)

औरंगाबादमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, कुरिअर कार्यालयातून ३७ तलवारी जप्त

उमेश सूद, अनिल होन, मनिंदर, आकाश पाटील यांच्यावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अशोक इंदलकर म्हणाले, “शुक्रवारी आम्हाला पुण्यातील एका कुरिअर कार्यालयातून एक मोठे, संशयास्पद पार्सल असल्याचा फोन आला. आमच्या कर्मचाऱ्यांनी ते पॅकेज उघडले, तेव्हा त्यांना तलवारी आढळल्या. पॅकेज लुधियानाचे आहे. या तलवारी कोणी मागवल्या याचा तपास करत आहोत.”

“काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्येही अशीच एक घटना समोर आली होती, जिथे कुरिअरद्वारे 15 हून अधिक तलवारी मागवण्यात आल्या होत्या. त्या लुधियानाहूनही आल्या होत्या. आम्ही दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहोत,”

Leave A Reply

Your email address will not be published.