Sunday, May 29, 2022

ऑनलाईन मागवल्या ३७ तलवारी; औरंगाबादला गुन्हा दाखल

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

औरंगाबाद :औरंगाबाद शहरात पोलिसांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. शहरात पुन्हा एकदा तलवारी मागविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.  कुरियरने 37 तलवारी मागवण्यात आल्याचा प्रकार औरंगाबादला उघडकीस आला असून याप्रकरणी कुरिअर कंपनीच्या मॅनेजरसह एकुण सात जणांविरुद्ध क्रांती चौक पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या छापेमारीत आढळून आलेल्या तलवारी जप्त केल्यानंतर खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

लाकडी खेळणी मागवण्याच्या नावाखाली धारदार तलवारी मागवण्याचा प्रकार 9 ते 29 मार्च दरम्यान सुरु होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तलवारी वेळीच जप्त केल्याने भविष्यात होणारा अनर्थ टळला असून सतर्क राहण्याची गरज असल्याचे देखील या घटनेतून उघड झाले आहे.

डीटीडीसी कुरिअरचा मॅनेजर वाल्मीक चोखाजी जोगदंड (44), रा. संजयनगर औरंगाबाद याच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. मे 2018, जुलै 2021 व त्यानंतर आता तिस-यांदा औरंगाबाद येथे कुरिअरने तलवारी मागवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या