चंदनाच्या झाडाची चोरी; गुन्हा दाखल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

नाशिक : चंदनाच्या झाडाची चोरी. पाथर्डी फाटा परिसरातून चोरट्याने चंदनाचे झाड तोडून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी संजु अप्पासाहेब कडु (५७, रा. धात्रकफाटा) यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.

संजु कडू यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने मिलींद कोल्हे यांच्या फार्महाऊसमधील चंदनाचे झाड चोरून नेले. तर दुसऱ्या झाडाचा बुंधा कापून नुकसान केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.