the jam the gift poster kenya airways coupon code baby wash coupons the gift that keeps on giving trademark printable funny coupons for him harbour freight torque wrench coupon
Thursday, December 1, 2022

सिमेंट व हार्डवेअर दुकानात 6 लाख रुपयांसह लॅपटॉप चोरीला

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

नाशिक

- Advertisement -

सुरगाणा; येथील उंबरठाण रस्त्यालगत असलेल्या हरि ओम सिमेंट व हार्डवेअर दुकानात सहा लाख रूपयांची चोरी झाली आहे. रविवारी (दि.२०) रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान ही घडली आहे.

- Advertisement -

येथील चोरीचे सत्र सुरूच असून रविवारी (दि.२०) रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान येथील हरि ओम सिमेंट एजन्सी मध्ये मागील बाजूने अज्ञात चोरट्याने प्रवेश करून ड्रॉवरमध्ये ठेवलेली ५ लाख ८७ हजार रुपयांची रोकड व १५ हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप अशी तब्बल ६ लाख २ हजार रूपयांची चोरी झाली. आत प्रवेश करण्यापूर्वी अज्ञात चोरट्याने बाहेरील बाजूस असलेले सीसीटीव्ही कॅमेरे फिरवून दिले होते. मात्र दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-यात चोरी करतानांची हालचाल कैद झाली आहे.

चेहरा झाकला असल्याने ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याठिकाणी आलेल्या ठसे तज्ज्ञांना दोन ठसे मिळाले असल्याचे सांगण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड यांनी भेट देऊन माहिती घेत आवश्यक सुचना केल्या. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक निलेश बोडखे करत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या