Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अल्पवयीन मुलीला बळजबरीने शेतात नेवून अत्याचार; एकाने ठेवली पाळत
    गुन्हे वार्ता

    अल्पवयीन मुलीला बळजबरीने शेतात नेवून अत्याचार; एकाने ठेवली पाळत

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 22, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    यवतमाळ :येथील अल्पवयीन एका १७ वर्षीय मुलगी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गावाबाहेर शौचास जात असताना दोन तरुणांनी मोटारसायकलवर येत मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसविले. त्यानंतर जवळच्या शेतात झुडपात नेऊन  एकाने तिच्यावर अत्याचार केला. तर दुसऱ्याने ये-जा करणाऱ्यांवर पाळत ठेवली.

    सोमवारी तालुक्यातील कुंभा शेतशिवारात घडलेल्या या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली असून समाजमन सुन्न झाले आहे. मारेगाव पोलिसांनी सायबर सेलची मदत घेत दोघाही आरोपींना राळेगाव येथून अटक केली आहे.

    शहबाज शेख शब्बीर (वय २७, रा. मातानगर, राळेगाव) व हर्षल लाला मडावी (वय १८) अशी आरोपींची नावे आहेत. घटनेनंतर पीडितेने आपल्या पालकांसह मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्याचाराचे गुन्हे दाखल केले आहेत.

    १७ वर्षीय मुलगी सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शौचास जाण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली. गावालगतच्या शिवाराकडे ती मोबाइलवर बोलत निघाली. याचवेळी अचानक मागून दोन युवक आले. काही कळायच्या आत त्या दोघांनी जबरीने तिला मोटारसायकलवर बसवून शेतशिवारात नेले. तेथे दुचाकीवरून उतरवून नंतर तिला फरफटतच राजू केळकर यांच्या शेतातील झुडपात नेले. यावेळी पीडितेने बचावासाठी आरडाओरड केला. मात्र, आजूबाजूला कुणीही नसल्याने तिला मदत मिळाली नाही.

    दोघांपैकी एकाने तिला मारहाण करीत तिच्यावर अत्याचार केला. यावेळी त्याचा सहकारी घटनास्थळाकडे कुणी येत नाही ना, यासाठी पाळत ठेवून होता. दरम्यान, अत्याचारानंतर त्या दोनही आरोपींनी दुचाकीद्वारे तेथून पळ काढला. त्यानंतर पीडितेने तिच्यावर घडलेला प्रसंग आईपुढे कथन केला. आईने लगेच तिला सोबत घेऊन मारेगाव पोलीस ठाणे गाठले.

    या घटनेची तक्रार प्राप्त होताच, सहायक पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांनी आरोपींच्या अटकेसाठी हालचाली सुरू केल्या. यवतमाळच्या सायबर सेलची मदत घेत संबंधित मोबाइल क्रमांकाचे लोकेशन शोधून काढले. त्यानंतर ते लोकेशन राळेगाव पोलिसांना देण्यात आले. मारेगावचे सहायक पोलीस निरीक्षक मुडे यांच्या मदतीने अत्याचार प्रकरणातील दोन्ही आरोपींच्या मुसक्या अवघ्या काही तासात आवळण्यात आल्या.

    crime news yavatmal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif