Saturday, October 1, 2022

धक्कादायक.. तरूणीवर चुलत मामेभावाकडून अत्याचार; गुन्हा दाखल

- Advertisement -

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

पाचोरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका १९ वर्षीय तरूणीवर चुलत मामेभावाने वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

१९ वर्षीय तरूणीचा चुलत मामे भाऊ नितीन प्रल्हाद अहिरे याने तिच्याशी मैत्री करून त्याच्या घरी व फर्दापूर येथील लॉजवर वेळोवेळी अत्याचार केला. संशयिताने अत्याचार केल्याची व्हिडीओ काढून तिला दाखवत पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिच्यासोबत केलेले अत्याचाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर मित्रांना प्रसारित केले.

पिडीत तरूणीच्या नातेवाईकांनी याचा जाब विचारला असता त्यांनी जीवेठार मारण्याची धमकी दिली. पीडीतेसह नातेवाईकांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी चुलत मामे भाऊ नितीन प्रल्हाद अहिरे, चुलत मामा प्रल्हाद दशथ अहिरे आणि चुलत मामी यांच्याविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक नजन पाटील करीत आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या