विवाहितेचा दोन लाखासाठी छळ; गुन्हा दाखल

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील माहेर असलेल्या विवाहितेचा २ लाखासाठी छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील माहेर असलेल्या दर्शना अरुण तेली (वय २१) यांचा विवाह सुरत येथील अरुण एकनाथ तेली यांच्याशी सन-२०१७ मध्ये रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या काही दिवसानंतर पती अरुण तेली यांनी माहेरहून २ लाख रुपये आणावे, यासाठी चापटाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. त्याच प्रकारे जेठ, जेठाणी, सासू आणि सासरा यांनी गांजपाठ केला आणि विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून घेऊन मानसिक त्रास दिला.
हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता या माहेरी बहादरपूर येथे निघून आल्या.

या संदर्भात विवाहिता यांनी पारोळा पोलीस ठाण्यात सोमवारी ३१ जानेवारी रोजी धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती अरुण एकनाथ तेली, जेठ समाधान नथ्थू चौधरी, जेठाणी दिपाली समाधान चौधरी, सासू कमलबाई एकनाथ चौधरी, आणि सासरे एकनाथ नथू चौधरी यांच्याविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार इकबाल शेख करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.