अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; ६ जणांवर गुन्हा दाखल

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

तालुक्यातील वरसाडे प्र. बो. येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सातारा येथे गेल्या तीन वर्षांपासून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली असून पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून मल्हार पेठ, जि. सातारा पोलिस स्टेशनमध्ये ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरचा गुन्हा शुन्य क्रमांकाने पाचोरा पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे.

वरसाडे प्र. बो. येथील एक कुटुंब कराड जि. सातारा येथील साखर कारखान्यात लागणाऱ्या ऊस तोडणी साठी सन – २०१९ पासुन वास्तव्यास होते. दरम्यान कुटुंबातील एका १६ वर्षीय मुलीचे सातत्याने लैंगिक शोषण होत होते. सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून मल्हार पेठ जि. सातारा येथील पोलिस ठाण्यात दिपक शांताराम सोनवणे, कल्पना शांताराम सोनवणे, शांताराम भगवान सोनवणे, शालिक सोनवणे, सिंधु भरत भिल, भरत भिल, (सर्व रा. वरसाडे प्र. बो. ता. पाचोरा) या ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा हा शुन्य क्रमांकाने पाचोरा पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील हे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here