Sunday, May 29, 2022

लग्नाचे आमिष दाखवून 10 वर्षे अत्याचार; आरोपीला अटक

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्युज नेटवर्क 

- Advertisement -

 

- Advertisement -

नाशिक; लग्नाचे आमिष दाखवून 10 वर्षे अत्याचार. एका तीस वर्षीय पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित गणेश राजाराम भोसले (३४, रा. मातोश्री कॉलनी, खोडेनगर) यास पोलिसांनी अटक केली आहे. संशयित भोसले याने पीडितेला सप्टेंबर २०१२ ते जानेवारी २०२२ दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला. तसेच अश्लील चित्रफिती दाखवून कळत-नकळत मद्य पाजत शारीरिक अत्याचार केले.

पीडित युवतीची नग्नावस्थेत छायाचित्रे, व्हिडीओ काढत ते नातेवाइकांना पाठविण्याची धमकी देत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग करत बळजबरीने इगतपुरीतील रिसॉर्ट, राहत्या घरी, तपोवनातील निर्जन ठिकाण, औरंगाबाद रोडवरील विविध हॉटेलमध्ये घेऊन जात अनैसर्गिक शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गणेशविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या