Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»मोठी बातमी : ममुराबाद रोडवरील बोगस कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह आठ जण ताब्यात 
    उत्तर महाराष्ट्र

    मोठी बातमी : ममुराबाद रोडवरील बोगस कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह आठ जण ताब्यात 

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 28, 2025Updated:September 28, 2025No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मोठी बातमी : ममुराबाद रोडवरील बोगस कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह आठ जण ताब्यात 

    कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांची फसवणूक

    जळगाव I लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगावातील ममुराबाद रोडवरील एल.के. फार्म येथे परदेशी नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी 28 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता धडक कारवाई केली. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली टाकलेल्या छाप्यात 31 लॅपटॉपसह हायटेक सेट-अप जप्त करण्यात आला आणि आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. फार्मचे मालक माजी महापौर ललित कोल्हे यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

    27 सप्टेंबरला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी कारवाई केली. कॉल सेंटरमधील कर्मचारी स्वतःला “अधिकृत एजंट” म्हणवून परदेशी नागरिकांना आकर्षक योजनांचे आमिष दाखवत फसवणूक करत होते. ताब्यात घेतलेल्या आठ आरोपींनी सांगितले की, 20-25  जण मुंबई आणि कोलकता येथून आलेले तरुणकार्यरत होते, त्यापैकी बहुतांश राज्याबाहेरील आहेत. यामुळे आंतरराज्यीय टोळी असण्याची शक्यता आहे.

    जप्त उपकरणे आणि डेटाची तपासणी सुरू असून, या रॅकेटचे जाळे किती मोठे आहे, याचा माग काढला जात आहे. ललित कोल्हे यांच्या मालकीच्या फॉर्मवर हे कॉल सेंटर सुरू असल्याने त्यांचीही चौकशी होत आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, शनिपेठ पोलीस स्टेशन आणि तालुका यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी या कारवाईस सहभाग घेतला.

    ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीतांमध्ये माजी उपमहापौर ललित कोल्हे, नरेंद्र आगरिया , राकेश आगरिया, चंदू आगरिया, नंदू आगरिया, स्वयंपाकी अली, तसेच कोलकाता येथून आलेले शाबाज आलम, जिशान नूरी, हाशीर रशीद या आठ जणांना चौकशी करिता ताब्यात घेण्यात आले आहे.

    याबाबत अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी माहिती देताना सांगितली की, विदेशी नागरिकांची वेगवेगळ्या कंपनीची एजंट असल्याचे भासवून फसवणूक होत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. याची खातर जमा केली असता प्रथमदर्शनी हे बोगस कॉल सेंटर असल्याचे आढळून आले. त्यानुसार आज रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलिसांच्या विविध पथकाने छापा टाकून पाहणी केले असता 31 लॅपटॉप आढळून आले. तसेच या ठिकाणी कॉल सेंटरचे लूक दिले असल्याचे दिसून आले. यातील मुंबई येथून हे कॉल सेंटर हाताळणारे अकबर, अली आणि इमरान नावाच्या तीन जणांची नावे चौकशीतून समोर आली आहेत अशी माहिती नकाते यांनी दिली.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime fraud call centre jalgaon Lalit Kolhe
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif