अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क

चोपडा तालुक्यात शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा तालुक्यातील एका गावातील शाळेत १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ८ वीमध्ये शिक्षण घेत आहे. या शाळेत सुनील संतोष भागवत हा संशयित आरोपी शिक्षक आहे. सुनील भागवत याने अल्पवयीन विद्यार्थीनीशी वैयक्तिक संबंध प्रस्तापित करण्याच्या वाईट उद्देशाने पिडीतेच्या आईचा नंबरवर दि. १५ जानेवारी ते आज पावेतो वेळोवेळी फोन करून अश्लील संभाषण केले.

तसेच दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास पिडीता शाळेत एकटी असतांना तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे गैरकृत्य केले. या प्रकरणी शिक्षक सुनील भागवत विरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पो उपनिरीक्षक घनश्याम तांबे हे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.