लग्नाच्या नावाखाली तरुणाला २ लाख ९० हजारात गंडवले

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लग्न लावून देण्याच्या नावाखाली चोपडा शहरातील एका ३९ वर्षीय तरुणाची २ लाख ९० हजारात फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा शहरातील दीपक भुरेसिंग बारेला (वय ३९) यांना लग्न करण्याकरिता २ महिलांसह ३ पुरुषांनी दीपक यांची २ लाख ९० हजार रुपयात फसवणूक केली. लग्न लावून देण्यासाठी संशयित आरोपी राधा रामधन परदेशी, रामधन मोहन परदेशी, कविता कृष्ण कडाळी, अमित कातकरी, कैलास अशोक पाटील यांनी नाशिक येथील पंचवटी येथे बनावट कागदपत्र बनवत त्याला सांगतिले की, मुलीचे पहिले लग्न झाले आहे.

तसेच मुलीने सांगतिले की, पहिल्या नवऱ्याकडे एक महिना आणि तुमच्याकडे १५ दिवस राहील असे सांगून संशयित आरोपीनी वेळोवेळी बँके खात्यावर दीपककडून २ लाख ९० हजार रुपये घेत फसवणूक केली. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र सोनवणे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.