चोरीच्या प्रयत्नात असलेले दोन गुन्हेगार अटकेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

एमआयडीसी पोलीसांनी चोरीच्या उद्देशाने शहरात फिरणाऱ्या दोन संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून कार व चोरीचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचार्‍यांचे पथक एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना अरविंद उर्फ आरु अरुण वाघोदे (वय २५, रा.सुप्रीम कॉलनी) व अनिल रमेश चौधरी (वय ४०, रा.अयोध्या नगर) हे दोघ संशयित संशयास्पदरित्या दिसले. पथकाने त्यांना थांबविले असता त्या दोघांनी याठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून घरफोडीसाठी लागणारे साहित्य व कार जप्त करण्यात आली. तसेच अटक केलेले दोघंही संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. तसेच त्याच्यावर आतापर्यंत सुमारे १० घरफोडीवरील गुन्हे दाखल आहेत. तर अनिल चौधरी याने मुक्ताईनगरात झालेल्या घरफोडीत त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here