कंपनीच्या पार्किंगमधून दुचाकीसह मोबाईल चोरला !
जळगाव : शहरातील एमआयडीसीतील लिग्रॅन्ड
कंपनीच्या पार्कीगमधून प्रणव अनिल पाटील (वय २१, रा. वाटीका आश्रम) यांची (एमएच १९, डीसी १३५२) क्रमांकाची ३० हजार रुपयांची दुचाकी आणि २० हजार रुपयांचा आयफोन कंपनीचा मोबाईल चोरुन नेला. ही घटना दि. २६ रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ गणेश शिरसाळे हे करीत आहे.

