पाण्याच्या वादातून युवकावर हल्ला ; लोखंडी पेंचकसने गंभीर दुखापत
शिवाजी नगर हुडको परिसरात .घडली घटना
पाण्याच्या वादातून युवकावर हल्ला ; लोखंडी पेंचकसने गंभीर दुखापत
जळगाव: – शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरात रस्त्यावर पाणी वाहत असल्याच्या किरकोळ कारणावरून वाद उफाळला आणि एका व्यक्तीला लोखंडी पेंचकसने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. हा प्रकार सोमवार, १७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता घडला.
शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरात बाबुलाल खान गुलाब खान (वय ४५) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरासमोर पाणी वाहत असल्यामुळे गल्लीत राहणाऱ्या जाकीर, बाबू, रुकय्या, त्यांच्या दोन्ही मुलांसह बहिण शहनाज यांनी वाद घालण्यास सुरुवात केली.त्यांनी बाबुलाल खान यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी जाकीर याने हातातील लोखंडी पेंचकस डोक्यात टाकून गंभीर जखमी केले.
या हल्ल्यामुळे जखमी झालेल्या बाबुलाल खान यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी जाकीरसह इतरांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.