हरियाणातील सोनीपत येथे भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या  

0

हरियाणातील सोनीपत येथे भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या  

सोनीपत, हरियाणा: हरियाणातील सोनीपत येथे भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्याची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. भाजप मुंडलाना मंडळ अध्यक्ष सुरेंद्र जवाहर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

ही घटना शुक्रवारी रात्री ९:३० वाजता जवाहर गावात घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, सुरेंद्र जवाहर यांच्यावर त्यांच्याच शेजाऱ्याने गोळीबार केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा हल्ला कैद झाला असून, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये सुरेंद्र जवाहर एका दुकानात पळत जाताना दिसतात, तर आरोपी त्यांचा पाठलाग करत गोळ्या झाडतो. या गोळीबारात सुरेंद्र जवाहर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

जमिनीच्या वादातून हत्या?

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने सुरेंद्र जवाहर यांना जमिनीवर पाऊल ठेवू नका, अशी धमकी दिली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला आणि गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

 

या घटनेचा सविस्तर तपास सुरू असून, आरोपीचे नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही. मात्र, जमिनीच्या आणि मालमत्तेच्या वादातूनच ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हरियाणातील या धक्कादायक हत्याकांडामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, सुरेंद्र जवाहर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.