नवरी बनली बबली ! नवरदेवाला लुटून पसार; दहा दिवसातच रचलं दुसरं लग्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

26 मार्चला लग्न झालं नव्या आयुष्याला सुरुवात झाली. त्यासाठी मुलाने मोठे स्वप्न पाहिले. लग्नानंतर तिच्यासोबत तो फिरायला गेला. एका पर्यटन स्थळी तो तिकीट रांगेत उभा असताना ती खाऊ घ्यायचा निमित्ताने बाजूला गेली आणि तेवढ्यातच ती एका बोलेरो गाडीत बसून दगिन्यांसह पसार झाली.

नववधू बनून नवरदेव आणि सासरच्यांना लुटून पळून जाणाऱ्या मुलींचे रॅकेट सक्रिय आहे. औरंगाबाद ते खुलताबाद येथील मावसाळा इथे लग्नानंतर तिसऱ्या दिवशी दौलताबाद किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेली नववधू नवरदेवाला सोडून फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ती घटना 29 मार्च रोजी झाली असून या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

कुठली ओळख नसताना केवळ मध्यस्थीने विवाह झाला. औटघटकेचा घरात दागिने आणि पैशांची फसवणूक झाल्याने नवरदेवाकडील मंडळी संताप व्यक्त करताय. त्याचबरोबर दुष्काळ कधी गारपीट आणि बेरोजगारीने त्रस्त असलेल्या मराठवाड्यातील तरुणांना गंडा घालण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे.

26 मार्च 2022 रोजी दौलताबाद येथील दत्तमंदिरात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न पार पडलं. लग्नासाठी नवरदेवाच्या नातेवाईकांनी मुलींच्या नातेवाईकांना एक लाख तीस हजार रुपये रोख दिले, तसेच लग्नात नवरी मुलीच्या अंगावर 70 हजार रुपयांचे दागिने घातले. लग्न देखील मुलाकडे करा असा आग्रह नातेवाईकांनी केला.

लग्नाचे खोटे नाटक करून 1लाख 30 हजार रुपये लुबाडून 70 हजारांचे दागिने घेऊन फरार झाल्याची तक्रार दौलताबाद पोलिस ठाण्यात नवरदेवाने दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.

अन 11 व्या दिवशी दलालांमार्फत दुसरं लग्न

पहिल्या लग्नाला दहा दिवस होताच अकराव्या दिवशी पुन्हा त्याच मुलीचे लग्न मध्यस्थीच्या माध्यमातून रक्कम घेत लग्न जुळवून आणून त्या मुलीला अमळनेर तालुक्यातील शिरुड गावात देण्यात आले. यासाठी देखील दोन लाखापेक्षा अधिक पैसे मोजून दिले असल्याचे मुलाकडच्या नातेवाईकांनी सांगितले.

या प्रकरणी लग्न लागल्यानंतर देखील लग्नाच्या स्टेजवर पैशांवरून राडा झाला होता. पण तो राडा आपसात मिटला. दुसऱ्या दिवशी ही घटना बातमीच्या माध्यमातून उघडकीस आला. या मुलीचे काही दिवसांपूर्वी एका ठिकाणी लग्न पार पडले आहे. व्हिडिओ बातमीच्या माध्यमातून प्रकार उघडकीस आला. त्याक्षणी या नवरदेव मुलाची व त्याच्या नातेवाईकांची पायाखालची वाळू सरकली.

नुकतेच अकरा दिवसांपूर्वी या तरुणीचे लग्न झाले आहे. याबाबत गावात बोंब फुटली आणि पुन्हा गावात राडा झाला. दलालांमुळे गरीब परिवाराला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. पुढे सर्व प्रकरणाकडे बघता लग्नाच्या संबंधांमध्ये एजंट लोकांकडून मागण्यात येणारा पैसा आणि त्यानंतरची होणारी फसवेगिरी, यामुळे नवरदेव आणि त्याच्या घरच्यांवर मात्र डोक्यावर हात मारुन घेण्याची वेळ आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.