चाकूचा धाक दाखवून युवकाला लुटले !

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
तरूणाला चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील सोन्याची साखळी व कानातील बाही असा एकुण ४२ हजारांचा मुद्देमाल अज्ञात दोन जणांनी चोरून नेल्याची घटना जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात समोर आली आहे. याबाबत रात्री उशीरा अज्ञात दोन जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, संकेत सुनिल माळी (वय-१९) रा. जोशी पेठ, जुने जळगाव हा तरूण . शनिवार ४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता मेहरूण तलावाजवळील एका टेबलाच्या बाकड्याजवळ बसलेला होता. त्यावेळी विना क्रमांकाच्या दुचाकीवरून अनोळखी दोन व्यक्ती त्यांच्याजवळ आले. यातील एकाने चाकूचा धाक दाखवत संकेत जवळील ४२ हजाराची सोन्याची चैन व कानातील बाही जबरदस्तीने काढून पलायन केल्याचा प्रकार घडला. घटनेनंतर संकेतने आराडाओरड केल्याचा फायदा झाला नाही . रविवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.