Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»लोकार्थ»शनिवारपासून जळगावात क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो!
    लोकार्थ

    शनिवारपासून जळगावात क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 6, 2026Updated:March 6, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    महाराष्ट्रातील प्रगतिशील शहरांमध्ये नाशिकचे नाव अग्रक्रमाने घेतले जात असून, औद्योगिक, शैक्षणिक, आरोग्य व कृषी क्षेत्रातील संधीमुळे नाशिक प्रॉपर्टी गुंतवणुकीसाठी नागरिकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. या संधींची माहिती एकाच छताखाली मिळावी, यासाठी बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय स्तरावरील सर्वांत मोठी संस्था क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे नाशिक प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन ७ ते ९ मार्चदरम्यान जळगाव येथील सागर पार्क मैदानावर होणार असल्याची माहिती माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी दिली.

    पत्रकार परिषेदत पुढे बोलताना श्री. ठक्कर म्हणाले, की नाशिकला हवेची गुणवत्ता व पाण्याची मुबलकता यांचे वरदान लाभले आहे. मुंबई-पुण्यापासून कमी अंतर, तसेच देश-विदेशातील प्रमुख शहरांशी वाढलेली कनेक्टिव्हिटी यामुळे नाशिक रिअल इस्टेट क्षेत्र भविष्यात लाभदायी ठरणार आहे.

    चेन्नई सुरत महामार्ग, वाढवन बंधारा विकास, समृद्धी महामार्ग व खानदेश एक्सप्रेसवेद्वारे जळगाव नाशिकला सहा पदरी रस्त्याने जोडण्याच्या घोषणामुळे या भागातील गुंतवणुकीच्या संधी अधिक विस्तारल्या आहेत. यामुळे यावेळी क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष मनोज खिवंसरा, सतीश मोरे, विजय चव्हाण, दीपक सराफ, तुषार महाजन यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

    प्रदर्शनाचे समन्वयक सागर शहा यांनी सांगितले की, गेल्या 28 वर्षापासून कार्यरत असलेली ही संस्था आज राष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठी बांधकाम व्यवसायिकांची संघटना आहे. जळगावातील या प्रदर्शनात नाशिकचे आघाडीचे 25 पेक्षा अधिक विकासक सहभागी होणार असून फ्लॅट्स, प्लॉट्स, फार्म हाऊस, शॉप्स व ऑफिसेस यांचे पर्याय उपलब्ध राहतील. प्रदर्शनाचा लेआउट व व्यवस्था आंतरराष्ट्रीय स्तराला साजेशी असणार आहे. समन्वयक अनंत ठाकरे यांनी सांगितले की, कुंभमेळ्यामुळे नाशिक मध्ये भरपूर विकासाची कामे होत असल्याने रियल इस्टेटमध्ये तेथील देखील याचा चांगला परिणाम पडणार असून विविध क्षेत्रातील संधीमुळे नाशिक रियल इस्टेट गुंतवणूक भविष्यातील उत्तम पर्याय ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    सकाळी दहा ते रात्री ८ पर्यंत तीन दिवस असलेल्या प्रपिटर्टी एक्स्पोमध्ये नाशिकसोबतब इगतपुरी, कसारा, त्रंबकेश्वर, दिंडोरी या भागातील प्रकल्पांचे स्टॉल असणार आहेत. तसेच प्रदर्शनाचे प्रायोजक म्हणून अर्बन स्टाईल्स तर सहप्रायोजक म्हणून क्रिश ग्रुप यांनी जबाबदारी स्वीकारली आहे, अशी माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा यांनी दिली. नागरिकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहर क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    माणसाने झेपेल तितकेच बोलावे!

    April 17, 2026

    किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी

    April 17, 2026

    शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.