Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगावात वाहतूक नियमभंगाविरोधात धडक मोहीम
    जळगाव

    जळगावात वाहतूक नियमभंगाविरोधात धडक मोहीम

    271 वाहनचालकांवर कारवाई : दोन लाखांहून अधिक दंड वसूल
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 4, 2026No Comments289 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जिल्ह्यात सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने शहर वाहतूक शाखेकडून विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 271 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

    दि. 3 जून रोजी राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेदरम्यान हेल्मेटचा वापर न करणे, सीटबेल्ट न लावणे, वाहतूक सिग्नलचे उल्लंघन करणे, विनापरवाना वाहन चालविणे तसेच इतर विविध नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 2 लाख 3 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्ह्यात वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. विशेष मोहिमेमुळे वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सकारात्मक संदेश पोहोचल्याचे दिसून आले. या मोहिमेच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. हेल्मेट व सीटबेल्टचा नियमित वापर, वेगमर्यादेचे पालन तसेच वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळल्यास अनेक अपघात रोखता येऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी केले.

    ही विशेष मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एक अधिकारी आणि 23 अंमलदारांनी मोहिमेत सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी बजावली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असून अशा विशेष तपासणी मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif