Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»शेंदुर्णीत गोवंश मांस विक्रीवर धडक कारवाई
    गुन्हे वार्ता

    शेंदुर्णीत गोवंश मांस विक्रीवर धडक कारवाई

    १० जनावरे जप्त, ३ जणांना घेतले ताब्यात : गुन्हा दाखल
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 3, 2026No Comments406 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    शेंदुर्णी ता. जामनेर

    महाराष्ट्र दिनी, दि. १ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजता शेंदुर्णी येथील कुरेशी वाड्यात कत्तलीसाठी जनावरे आणून गोवंश मांस विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पहूर पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ धडक कारवाई करत छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी कत्तलीसाठी आणलेली सुमारे १० जनावरे जप्त केली असून मांस विक्री करणाऱ्या ३ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

    ही कारवाई पहूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे आणि पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांच्या सोबत पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, गणेश सुस्ते, सहायक फौजदार राजेंद्र परदेशी तसेच पोलीस कर्मचारी दीपक सुरवाडे, योगेश सुतार, विलास चव्हाण, मनोज बाविस्कर, उद्दल चव्हाण, सुभाष पाटील, ज्ञानेश्वर ढाकरे, नरेश घाडगे, प्रशांत बडगुजर, राहुल पाटील, राहुल जोहरे, जीवन चव्हाण, गजानन पाटील, संदीप धनगर, महिला पोलीस शिपाई राजश्री मोर्य आणि मनिषा चौधरी यांनी सहभाग घेतला.

    या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११६/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम ३२५ तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ३(क), ९(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये १) शेख जमीन शेख लतीफ (वय ४८, रा. शेंदुर्णी) २) सलमान शेख शेख शिकलकर (वय २०, रा. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) ३) कुरेशी अफताफ अब्दुल रफिक ऊर्फ अल्ताफ शेख (वय २५, रा. शेंदुर्णी, ता. जामनेर, जि. जळगाव) यांचा समावेश आहे. या तिन्ही आरोपींना न्यायालयाने दि. ४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून इतर संबंधित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत ढीवरे, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव) कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    भयंकर! विषारी दारूमुळे ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif