covid update; आठ राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण, भारतात सध्या सर्व प्रसार

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

कमी झालेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. काल याच संदर्भात पंतप्रधान मोदींनी बैठक घेतली होती. दरम्यान, आज आरोग्य सचिवांनी पत्रकार परिषद घेत देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत महत्वाची माहिती दिली. आरोग्य सचिव राजेश भूषण (Health Secretary Rajesh Bhushan) म्हणाले, भारतात सध्या सर्व प्रसार झालेले कोरोना विषाणूचे प्रकार हे ओमिक्रॉनचे (Omicron) उपप्रकार आहेत.

ज्या आठ राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत त्यात महाराष्ट्र, गुजरात, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान यांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोणती कारवाई करण्याची आवश्यकतेबाबत मी 16 मार्च रोजी वैयक्तिकरित्या या राज्यांना पत्र लिहिले होतं. आत्तापर्यंत जगभरातील कोविडच्या एकूण प्रकरणांपैकी 1 टक्के प्रकरणं भारतात नोंदवली गेली आहेत. सध्या भारतातील अॅक्टिव्ह केसेस 7,600 वर आहेत. दररोज सरासरी 966 प्रकरणे नोंदवली जात आहेत.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दररोज सरासरी १०८ प्रकरणे नोंदवली जात होती, ती आता ९६६ वर पोहोचली आहे, अशी माहितीही केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.