बिग ब्रेकिंग; WHO केली कोरोनाची लाट अखेर समाप्त झाल्याची अधिकृत घोषणा…

0

 

कोरोना अपडेट, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

सर्व जगाला घरात बसवून लावण्यास भाग पडणाऱ्या कोरोना रोगाची लाट अखेर समाप्त झाल्याची अधिकृत घोषणा आज जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपात्कालीन परिस्थितीबाबतच्या बैठकीत कोविड-19 आता जागतिक आरोग्य आणीबाणी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव डॉ. टेड्रोस बोलले की, काल झालेल्या 15 व्या बैठकीत आपत्कालीन समितीने कोविड-19 कोरोनाला जागतिक आरोग्य आणीबाणीच्या कक्षेबाहेर घोषित करावे, अशी शिफारस केली होती. 30 जानेवारी 2020 WHO ने रोजी कोविडला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली होती. जागतिक आरोग्य आणीबाणी मागे घेतली असली तरी कोरोना अजूनही जागतिक आरोग्यासाठी धोका आहे, असेही यावेळी WHO ने स्पष्ट केले.

डब्ल्यूएचओने (WHO) सांगितले की, गेल्या वर्षभरात कोविडच्या प्रकरणांमध्ये झालेली घट लक्षात घेऊन सार्वजनिक जागतिक आरोग्य आणीबाणीतून कोरोना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा इतका मोठा परिणाम झाला की शाळा ते कार्यालय बंद राहिले. या काळात बरेच लोक तणाव आणि चिंतेतून गेले. त्यातून जागतिक अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले.

जागतिक आरोग्य आणीबाणी हटवली असली तरी कोरोनाचा धोका संपूर्णपणे संपलेला नाही. म्हणायला गेलो तर मागील आठवड्यात दर तीन मिनिटाला कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू होत होता. कोरोनाचे नवीन व्हेरिएंट येत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. असेही जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव डॉ. टेड्रोस यांनी म्हटले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.