शेतकऱ्यांचं पांढरं सोनं ११ हजार ५०० रु. प्रति क्विंटल..

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

पांढरं सोनं म्हणजे कापूस खान्देशातील खरीप हंगामाचे प्रमुख पीक म्हणून कापसाकडे पाहिले जाते. यावर्षी खरीपात पाऊस नसल्याने उत्पादन अत्यंत नगण्य आले. तसेच आपल्या देशातील व जगातील काही देशांमध्ये कापूस उत्पादनात यंदा घट झाली आहे आणि त्यामुळेच कापसाला यंदा विक्रमी भाव असल्याचे कापूस व्यावसायिकांनी सांगितले. दरम्यान अमळनेरच्या खासगी बाजारात सोमवारी (दि. २८) इतिहासातील सर्वोच्च १९ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

यंदा कापसाच्या उत्पादनात घट झाली भाव वाढले मात्र आवक घटली. मागील आठ दिवसांपासून कापसाच्या दरात सातत्याने वाढ सुरू आहे. दहा दिवसांपूर्वी कापूस १० हजार रुपये क्विंटलवर होता. त्यावेळी दरदिवशी दोन ते अडीच हजार क्विंटल कापसाची प्रति दिवस आवक होती. यातही यंदा दहा हजारांचा भाव सुमारे दोन ते अडीच महिने कायम असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विक्री केला आहे.

मात्र, मागील आठ ते दहा दिवसांपासून कापसाच्या दरात दरदिवशी ५०-१०० रुपयांनी वाढ झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आता कापूस विक्री थांबवली. सध्या खासगी बाजारात कापसाला ११ हजारांच्या वर भाव मिळत असून, शनिवारी कापसाला प्रतिकिंटल ११ हजार ५०० रुपये भाव खासगी बाजारात मिळाला आहे. मात्र सध्या आवक घटली आहे. सोमवारी ५०० किंटल कापूस विक्रीसाठी खासगी बाजारात आला होता, असे कापूस खरेदीदारांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.