आधीच कापसाला भाव नाही, त्यात चोरांनी लुबाडले

कापूस विक्री करून आलेल्या शेतकऱ्याला लुटले

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

कापूस विक्री करून आलेल्या एका शेतकऱ्याला दीड लाख रुपयांना लुटल्याची घटना जालन्यातील शिंगाडे पोखरी फाट्याजवळ घडली. हातातील बॅग घेऊन काहीजण पसार झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत शेतकऱ्याला लुटणाऱ्या टोळीच्या मौजपुरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे.

जालन्यातील वखारी येथील एक शेतकरी आपला कापूस विकून दीड लाख रुपये रोकड घेऊन गावाकडे  होता. मात्र त्यांच्यावर नजर ठेवून त्यांचा पाठलाग सुरु सुमसाम असलेल्या रस्त्यावर मोटरसायकलवर पाठीमागून आलेल्या चार जणांनी या शेतकऱ्याला अडविले. यानंतर शेतकऱ्याजवळ असलेली बॅग हिसकावून दीड लाख रुपये चोरून नेल्याची घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.

घडलेल्या घटनेने घाबरलेल्या शेतकऱ्याने मौजपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यान शेतकऱ्याने तक्रार दाखल केल्यानंतर मौजपुरी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. यात चार आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. यामध्ये कृष्णा शिंदे, विठ्ठल पास्टे, अनिकेत खरात, गजानन झाडे असे संशयित आरोपीचे नाव असून त्यांना मौजपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास मौजपूरी पोलीस करत आहे.

शेतकऱ्याचे दीड लाख रुपये चोरून नेल्याप्रकरणी चार आरोपींना मौजपुरी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे. संशयित आरोपींकडून वाहनांसह एकूण नऊ लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी अधिक तपास जालन्यातील मौजपुरी पोलीस करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.