लोकशाही संपादकीय लेख

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नजीक असलेल्या दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात काम न करताच कामाची बिले काढल्या प्रकरणी एक अधिकारी नामे इंगळे यांना निलंबित करण्यात आले असून, चीफ इंजिनिअर यांची बदली करण्यात आली आहे. एकूण 700 कोटी रुपयांची कामे केल्याचे दाखविण्यात आले असून, त्यापैकी 300 कोटींचे काम झाले असल्याचे दिसून आले. हे प्रकरण विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी पुराव्यानिशी मांडले होते. त्या प्रकरणात अधिकारी इंगळे यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.
दुसरे म्हणजे, दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या कॉर्टरमध्ये काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने झाले असून, त्यामध्ये सिमेंट, लोखंड आदी सर्व निकृष्ट प्रकारचे वापरण्यात आले आहे. त्या प्रकरणे सुद्धा अधिकारी रडारवर असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. चौकशी अंतिम अनेक अधिकारी निलंबित होण्याची दाट शक्यता आहे.
कामे न करता बिले काढणे म्हणजे काहीच काम झालेले नसताना बिले काढणे, हा तर अजबच प्रकार म्हटला पाहिजे. अलीकडे काम निकृष्ट दर्जाचे करून त्यात भ्रष्टाचार केल्याचे ऐकिवात आहे; पण काम न करता करताच बिल काढायची अधिकाऱ्यांची हिंमतच म्हटली पाहिजे. त्या अधिकाऱ्यांच्या हिमतीला दाद दिली पाहिजे. त्याला कोणती कोणाचा आशीर्वाद असल्याशिवाय हे शक्य नाही, असे म्हणतात ते खरे आहे.
या औष्णिक विद्युत केंद्राचे चीफ इंजिनियर हे त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठीशी होते किंवा आहेत. त्यावरून त्यांची बदली करण्यात आली आहे. “आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय,” असं जे म्हणतात, ते येथे तंतोतंत लागू पडते. राज्य शासनाचा हा प्रकल्प असला तरी, राज्यात किती प्रकारे कमिशन दिले जाते, ते देखील पाहिले पाहिजे. त्याशिवाय असे काम न करता बिल काढण्याचा प्रकार होणे शक्य नाही.
प्रथम दर्शनी चीफ इंजिनियर यांची भागीदारी असते. तशी भागीदारी असल्याशिवाय अशा प्रकारची कामे होणे शक्य नाही. चीफ इंजिनिअरच्या भागीदारी मधून राज्य शासनाकडे त्याचा वाटा जातो. त्यानंतर चीफ इंजिनियरचा वाटा येतो. त्यानंतर संबंधित बिल काढणारा अधिकारी याचा वाटा असतो. म्हणजे, आपण सारे मिळून गुपचूप खाऊया, अशातला हा प्रकार आहे.
म्हणजे काय, काही काम न करता बिले काढणे, याच्या हिमतीला दाद दिली पाहिजे. परंतु कोणीतरी कर्दनकाळ आपल्यावर नजर ठेवून असतो, हे त्या लक्षात येत नाही. सर्वाधिक पैसा हा आपल्याच बापाचा समजून त्यांची वेगळी विल्हेवाट लावायची, हा प्रकार एकनाथ खडसे यांनी उघडकीस आणला आणि तो विधान परिषदेत मांडण्यात आल्या नेत्यांचे धाबे दणाणले.
अधिकारी इंगळे निलंबित झाला. आणखीन काही अधिकारी निलंबित होतील. चीफ इंजिनिअर यांची बदली झालीच आहे. दुसरा भ्रष्टाचार म्हणजे, दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरच्या कामात निकृष्टपणा. हाही या कामातही संबंधित अधिकाऱ्यांना कामात निकृ ष्ट कमालीचा निकृष्टपणा केला आहे. याप्रकरणी अनेक अधिकारी रडारवर असून, त्यांची चौकशी होते आहे. या निकृष्ट कामां बाबीतही एकनाथ खडसे यांनी पुराव्यानिशी विधान परिषदेत प्रश्न मांडला. त्या प्रकरणात अनेक अधिकाऱ्यांची चौकशी सुरू झाली असून, त्यांना निलंबित करण्यात येईल असे दिसते.
एकंदरीत आपल्याच कर्मचाऱ्यांच्या कॉर्टरचे काम निकृष्टपणे करून, त्यांचा त्याच्यात वारमा भ्रष्टाचार करायचा आणि पैसे उकळायचे, हा एक जणू अधिकाऱ्यांचा धंदा झाला आहे. अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित नव्हे, तर त्यांना बडतर्फ केल्याशिवाय त्यांना धडा मिळणार नाही. अन्यथा एक गेला की दुसरा येईल आणि तो तशाच प्रकारचा भ्रष्टाचार करत राहील. त्यासाठी बरखास्त करणे, हा एकच उपाय आहे.


