बुलडाणा : आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांत मध्ये 3 रुग्ण हे मलकापूर चे असून, ते यापूर्वी सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील आहेत. तर एक रुग्ण बुलडाणा येथील असून तो दिल्ली मरकज वरून परतलेला असल्याची माहिती आहे. आधीच्या कोरोना बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील चार व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या 21 झाली आहे.. अशी माहिती जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिली आहे.
कोरोनाने बुलडाण्याला ‘रेड झोन’मध्ये आणून सोडले
मागील 4 दिवसांपासून जवळपास 50 रिपोर्ट प्रलंबीत होते. ते सर्व निगेटिव्ह आले होते. परंतु परवा आणि काल जे स्वॅब नव्याने पाठविले होते, त्यांचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. मलकापूरच्या एकुण स्वॅबपैकी अॅड. हरीष रावळ कोरोना निगेटिव्ह निघालेले आहेत. शिवाय मलकपूरच्या कोरोना रुग्णाला तपासणारे डॉक्टरसुद्धा निगेटिव्ह आहेत. परंतु संबंधीत कोरोना संसर्गीताच्या कुटूंबातील तीन जण पॉझिटीव्ह निघाल्याची माहिती आहे. तर बुलडाण्यात कोरोना संसर्गीताची एकाने वाढ झाली आहे. संबंधीत नवीन कोरोना रुग्ण जौहर नगर येथील रहिवाशी त्याचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला होता पण दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. बुलडाणा जिल्हा रेड झोन ठरत असून मलकापूरसाठीही ही धोक्याची घंटा आहे. एकट्या मलकापूरमध्ये एकुण चार रुग्ण झाले आहेत. आता बुलडाणा एकुण 6 (एक मृत), मलकापूर 4, शेगांव 3, चिखली 3, खामगांव (चितोडा) 2, देऊळगांवराजा 2 आणि सिंदखेडराजा एक, असे एकुण 21 जण कोरोना बाधित.