नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अमेरिका कोरोनाचं केंद्र बनलं असून अमेरिकेत कोरोनाने आतापर्यंत 22 हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. कोरोनामुळे अमेरिकेत लाखो बळी जाण्याची भिती तेथील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, अमेरिकेत करोनामुळे अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाल्याच पाहून भारतात अडकलेल्या अमेरीकन नागरिकांनी भारत सोडण्यास नकार दिला. अमेरीकन नागरिकांना परत मायदेशी नेण्यासाठी ट्रम्प सरकारने विशेष विमानांची व्यवस्था केल्या नंतर देखील अमेरिकन नागरीक भारतातच थांबण्याला प्राधान्य देत आहेत. त्यांच्या दृष्टीने भारतच सुरक्षित देश वाटू राहिलाय.
ऑस्ट्रेलियाने मागच्या आठवडयात भारतात अडकलेल्या आपल्या ४४४ नागरिकांना विशेष विमानाने मायदेशी नेले. अमेरिकेने सुद्धा आपल्या नागरिकांना मायदेशी नेण्याची व्यवस्था केली आहे. पण सध्या भारतात असलेले अमेरिकन नागरीक इथेच थांबण्याला प्राधान्य देत आहेत. भारतात अडकलेल्या नागरिकांना परत मायदेशी नेण्यासाठी आम्ही विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. पण अमेरिकन नागरीक भारतातच थांबण्याला प्राधान्य देत आहेत असे अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले.
भारतातील आमच्या स्टाफने ८०० अमेरिकन नागरिकांना विशेष विमानाने मायदेशी परतणार का? अशी विचारणा केली. त्यात फक्त १० जणांनी सकारात्मक प्रतिसाद दिला अशी माहिती इयन ब्राउनली या अधिकाऱ्याने दिली. भारतात अजूनही २४ हजार अमेरिकन नागरीक आहेत. करोना व्हायरसमुळे अमेरिकेत लाखो लोक बाधित असून हजारो नागरीक आपल्या प्राणास मुकले आहेत. अमेरिकेतून दररोज मृतांचा आकडा वाढत चालल्याच्या बातम्या येत आहेत.