coronavirus : इटलीत गेल्या २४ तासांत ६२७ जणांचा बळी

0

रोम:  जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आत्तापर्यंत 80 देशांमध्ये हा व्हायरस पोहचला आहे. या व्हायरसचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. इटलीत चीनपेक्षाही सर्वाधिक मृतांची नोंद झाली आहे. मागील २४ तासांत इटलीत ६२७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एकाच दिवसांत ५९८६ नवे रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.

इटलीत करोनाच्या संसर्गामुळे ४०३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २६५५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. करोनाच्या संसर्गामुळे उपचार सुरू असलेल्या ५१२९ जणांनी करोनावर मात केली आहे. मात्र, इटलीत रुग्ण आणि मृत्यूंचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.चीन व इटलीमध्ये करोनाच्या संसर्गामुळे सर्वाधिक मृत्यू हे वृद्धांचे झाले असल्याची चर्चा आहे. वृद्ध नागरिकांमध्ये आधीपासूनच कोणता तरी आजार असतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. तर, चीनमध्ये करोनावर नियंत्रण मिळवले असल्याचे सध्या चित्र आहे. चीनमध्ये नवीन करोनाबाधित रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.