टेन्शन : राज्यात पुन्हा कोरोना सक्रिय ; तीन जणांचा मृत्यू

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोनाने देशासह राज्यात पुन्हा डोके वर काढले असून राज्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे.

काही महिन्यात अत्यंत कमी झालेली रुग्णसंख्या आता वाढू लागू लागल्याने चिंताही वाढू लागली आहे. शुक्रवारी राज्यात 343 रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात राज्यात कोरोनाच्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यासाठी ही चिंतेची बाब आहे.

राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण 1763 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 8,65,71,673 इतक्या प्रयोगशाळा तपासण्या झाल्या आहेत. त्यापैकी 9.40 टक्के नमुने हे पॉझिटिव्ह सापडले आहेत.

शुक्रवारी राज्यात 343 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 194 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरातील असून पुण्यात 510 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ मुंबई, ठाण्याचा क्रमांक आहे. राज्यात कोरोनाच्या तीन मृत्यूची नोंद झाली आहे

राज्यात एकूण 194 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 79,90, 824 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.16 टक्के इतकं झालं आहे. राज्यात तीन कोरोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णाांची एकूण संख्या 81,41, 020इतकी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे की, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि खोकला 5 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. गंभीर लक्षणे किंवा उच्च ताप असलेल्या रुग्णांच्या बाबतीत पाच दिवसांसाठी रेमडेसिव्हिर औषधं घेतलं जाऊ शकतं पण, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावे .

Leave A Reply

Your email address will not be published.