Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»अचानक लागलेल्या आगीत १ लाखाचा मका खाक
    अपघात

    अचानक लागलेल्या आगीत १ लाखाचा मका खाक

    विजेच्या तारांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 4, 2026Updated:May 4, 2026No Comments156 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पाचोरा तालुक्यातील शेवाळे शिवारातील शेतात विक्रीसाठी काढुन ठेवलेल्या मका पिकास २ एप्रिल रोजी रात्री ते ३ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याने शेतकऱ्याचे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले असुन शेतकरी हवालदिल झाला आहे.

    भागाबाई बाजीराव पाटील रा. निंभोरी बुद्रुक ता. पाचोरा यांची शेवाळे शिवारात गट क्रमांक २२१/२ ही शेती जमिन आहे. सदरची शेती त्यांचे मुलगा भगवान बाजीराव पाटील (पत्रकार) हे करतात. या शेतीवर भगवान पाटील यांनी काबाडकष्ट करून मका पिक लावले होते. अतिशय मेहनत करुन भगवान पाटील यांनी पिकास वाढीस लावले. पिक पुर्ण तयार झाल्यानंतर विक्री करायची असल्याने ते काढणी करुन ढिग तयार केला होता. दरम्यान २ एप्रिल रोजी रात्री ते ३ एप्रिल रोजी पहाटे सुमारास मका पिकास अचानक आग लागली व या आगीत सुमारे १ लाख रुपये किंमतीचा ४० ते ५० क्विंटल मका जळुन खाक झाला.

    सदरचा प्रकार भगवान पाटील हे ३ एप्रिल रोजी पहाटे शेतात गेले असता त्यांचे लक्षात आला. मका पिकाच्या ढिगाऱ्या वरुन विज वितरण कंपनीच्या विद्युत तारा असल्याने व शेत शिवाराची लाईट रात्रीची असल्याने विद्युत तारांमुळेच आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असुन विज वितरण कंपनीकडे हताश झालेल्या शेतकऱ्याने नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif