Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    अपघात

    शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग

    शेतकऱ्याचे मोठे नुकसान : शासनाकडून मदतीची अपेक्षा
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 17, 2026No Comments131 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    मौजे वंजारी ता. धरणगाव येथील शेतकरी पुरुषोत्तम शंकर चौधरी यांच्या गट क्रमांक 39/2 मधील शेतात आज दुपारी सुमारे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार, वीज वाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

    या आगीत सुमारे 80 आर क्षेत्रातील उभे मका पीक पूर्णतः जळून खाक झाले असून 100 टक्के नुकसान झाले आहे. घटनेनंतर तत्काळ पंचनामा करण्यात आला असून तलाठी इफ्तार देशमुख यांनी पाहणी करून अहवाल तयार केला. यावेळी एमएसईबीचे स्थानिक कर्मचारी तसेच गावातील नागरिक तुषार यशवंत चौधरी, ताराचंद अशोक महाजन, नामदेव पांडुरंग पाटील, शंकर भगवान पाटील व शांताराम जगन्नाथ महाजन उपस्थित होते.

    दरम्यान, अशा प्रकारच्या शॉर्ट सर्किटमुळे शेतीपिकांचे नुकसान होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे दिसून येते.शासनाने त्वरित काहीतरी आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत

    May 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif