Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»भोंदूबाबा खरात प्रकरणात महिलांनाही दोषी ठरवा!
    गुन्हे वार्ता

    भोंदूबाबा खरात प्रकरणात महिलांनाही दोषी ठरवा!

    व्हिडीओ पाहिले तर महिलांना गुंगीचं औषध दिले असे...
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 3, 2026Updated:April 3, 2026No Comments657 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मी ज्योतिषी, भविष्य जाणतो, भविष्य सांगतो, असं म्हणत अनेक महिलांना जाळ्यात ओढत, कधी गोड बोलून, भुलवून तर कधी धमकी देऊन त्यांचं लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरात याचचं भविष्य अंधारात आहे. नाशिकच्या ओकस कॉर्नरमधील कार्यालयात महिलांना बोलावून, त्यांना पेढा आणि कडवट-खारट चव असलेलं पेय प्यायला दिल्यावर, त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या खरातने विकृतपणाची परिसीमा गाठत, या सर्व प्रकारचं रेकॉर्डिंगही केलं होतं. अखेर त्याच्या भोंदूत्वाचा बुरखा फाटलाच आणि एका महिलेच्या तक्रारीवरून 17 मार्चला पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून अटक केली. सध्या एसआयटीकडून याप्रकरणाची चौकश सुरू असून अशोक खरात न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.

    याच प्रकरणात आता एक मोठी अपडेट आली आहे. प्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरूणा सबाने यांनी या प्रकरणावरून आवाज उठवला असून त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं आहे. भोंदूबाबा खरात प्रकरणात महिलांनाही दोषी ठरवा. पिडीत महिलांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा चाकणकर यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणीही सबाने यांनी केली असून चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

    स्वच्छेने त्या महिला टेबलवर..
    लेखिका अरूणा सबाने यांनी खरात प्रकरणावरून टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं आहे. भोंदूबाबा खरात प्रकरणात महिलांनाही दोषी ठरवा, पिडीत महिलांना कडक शिक्षा व्हावी, असं त्यांनी पत्रात म्हटलंय. जर ते व्हिडीओ पाहिले तर महिलांना गुंगीचं औषध दिलं असं वाटत नाही, त्या हसत आहे, स्वच्छेने त्या महिला टेबलवर बसत आहेत, असं दिसतं असं म्हणत लैंगिक समाधान मिळवण्यासाठी गेलेल्या महिलांवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली.

    ज्या महिला स्वच्छेने भोंदू बाबा कडे गेल्या त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांना पिडीत म्हणता येणार नाही. ज्यांना घरच्यांनी जबरदस्तीने भोंदू कडे पाठवलं, त्यांना आपण पिडीत समजू शकतो. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा चाकणकर यांच्यावर कारवाई व्हावी असंही सबाने म्हणाल्या. सगळ्या शिकलेल्या महिला आहे. अशा भोंदू बाबाच्या आहारी कशा जातात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याप्रकरणात सबाने यांनी मुख्यमंत्र्यांना ई मेल आणि व्हॅाटसॲप द्वारे पत्र पाठवलं आहे. मात्र सबाने यांच्या पत्रामुळे खरातकडे गेलेल्या महिलांच्या अडचणी वाढू शकतात.

    मोठ्या प्रमाणावर कॅश यायची..

     न्यायलयीन कोठडीत असलेल्या अशोक खरातच्या मुलाला SIT ने ताब्यात घेतलं असून सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरातचा मुलगा सुरूवातील काहीच बोलत नव्हता, त्याने संपूर्ण मौन बाळगलं. मात्र पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती करताच, तो घडघड बोलू लागला. आमच्या घरात मोठ्या प्रमाणावर कॅश यायची. हे पैसे कुठून आणि कसे येत होते, याबद्दल मला काहीही माहिती नाही. त्याचे सर्व नियंत्रण डॅडकडे (अशोक खरात) होतं. त्यालाच प्रक्येक व्यवहार माहीत होता, अशी कबुली खरातच्या मुलाने दिली आहे. एसआटीकडून या प्रकरणात खरातशी संबंधित अनेक लोकांची, त्याने ज्या डॉक्टरांकडून महिलांना देण्यासाठी औषध घेतली त्यांची तसेच त्याच्या आर्थिक व्यवहाराशी निगडीत लोकांची चौकशी सुरू आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif