Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
    जळगाव

    कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्थिती : स्मार्ट सर्व्हिस ठेकेदाराच्या कारभाराविरुद्ध संताप
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 27, 2026No Comments94 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये कक्ष सेवक, लिपिक यांसह विविध पदांवर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून वेतन न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. रुग्णालयासारख्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर वेळेवर वेतन न मिळाल्याने उपासमारीची आणि आर्थिक कोंडीची वेळ आली आहे.

    वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून नियुक्त आणि स्मार्ट सर्व्हिस संस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मे आणि जून महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. तर इतर लिपिक, कक्षसेवक, टेलिफोन ऑपरेटर, प्लंबर, फिटर, इलेक्ट्रिशियन आणि लिफ्टमन या आणि इतर पदांवरील कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे वेतन थकीत आहे. वेतन वेळेवर न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे बँकेचे हप्ते थकले असून घरात किराणा भरण्यासाठी उधारीवर पैसे घेण्याची वेळ आली आहे.

    मानसिक तणावामुळे रुग्णालयीन कामांवरही याचा विपरीत परिणाम होत असून चुकांचे प्रमाण वाढत आहे. असे असतानाही स्मार्ट सर्व्हिसच्या ठेकेदारांनी या गंभीर समस्येकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. आपली व्यथा मांडण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आमदार राजूमामा भोळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्याकडे कर्मचाऱ्यांनी तोंडी तक्रार केली असता, होईल पगार, मी ठेकेदाराला सांगतो, असे मोघम उत्तर मिळालेली माहिती कर्मचाऱ्यांकडून मिळाली आहे.

    भत्ता वाढ न मिळाल्यानेही असंतोष

    वेळच्या वेळी वेतन न मिळण्यासोबतच कर्मचाऱ्यांना ठरल्याप्रमाणे भत्ता वाढ देखील देण्यात आलेली नाही. प्रशासकीय आणि ठेकेदाराच्या या उदासीन धोरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा रोष पसरला असून, थकीत वेतन व भत्ता वाढ तातडीने न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कर्मचाऱ्यांकडून दिला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif